महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मेगा भरती 2015
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २१६ पादांसाठी भरती होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०१५ अंतर्गत ही भरती होणार आहे.
उप जिल्हाधिकारी (९ जागा),पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (१३ जागा), सहायक विक्रीकर आयुक्त (३ जागा), उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (२१ जागा), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (१५ जागा), अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (१ जागा), तहसीलदार (१० जागा), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (१३ जागा), कक्ष अधिकारी (३८ जागा), सहायक गट विकास अधिकारी (९ जागा), गट विकास मुख्याधिकारी (३५ जागा), उप अधीक्षक भूमी अभिलेख (८ जागा), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (३ जागा), सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (१ जागा), नायब तहसीलदार (३७ जागा) या पदांसाठी ही भरती होत आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०१५ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in आणि h
ttps://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.